Satara News : औद्योगिक उपक्रमात ८० टक्के भूमिपुत्रांना घ्या


शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन - भोसले

Satara News : सर्व सूक्ष्म, लघू, मध्यम तसेच मोठ्या औद्योगिक उपक्रमांमधील कंत्राटी पध्दत बंद करून ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकऱ्यांची संधी दिली जावी. अन्यथा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या विविध समाजघटकांच्या संघटनांना बरोबर घेऊन राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, प्रसंगी उच्च न्यायालयापर्यंत जावू अशी कणखर भूमिका राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी मांडली आहे.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आज याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्यात असा शासन निर्णय असताना त्याची कोठेही अंमलबजावणी केली जात नाही. स्थानिक ठेकेदारांना हाताशी धरून कंत्राटी पध्दतीने अल्प मोबदल्यात कामगारांची भरती करून कंपन्या त्यांचे काम करून घेतात. राजकारणी मंडळीही अशा ठेकेदारांचा वापर निवडणुकांच्या राजकारणासाठी करतात. यामध्ये कामगार भरडले जातात. त्यामुळे हा विषय स्फोटक असल्याचे यशवंतभाऊ भोसले यावेळी म्हणाले.

... त्यांच्यावर खटले दाखल करा

हा विषय घेऊन आपण संपूर्ण राज्याचा दौरा करत असून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासोबत शासन निर्णयाची प्रत देऊन याची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहोत. सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी बैठक लावतो असे आश्वासन दिले आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील उद्योगांना ८० टक्केच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यास सांगावे. जे अंमलबजावणी करत नसतील त्यांच्यावर खटले दाखल करावेत असे त्यांनी सांगितले.

... तर बेरोजगारी राहणार नाही

ठेकेदार पोसणाऱ्या पुढाऱ्यांनी आता स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढावे. शासनाच्या जीआरची अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी आग्रह धरावा अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली. नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून कितीतरी उच्चशिक्षित तरूण नाईलाजाने अल्प पगारात नोकऱ्या करतात व नंतर खर्च भागत नाही म्हणून सोडून देतात. जर शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्रात बेरोजगारी राहणार नाही. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेनुसार सन्मानाने जगता येईल अशा पगाराची नोकरी मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या