खर्चात वाढ होऊनही ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर उपक्रम - गुरूप्रसाद सारडा
Satara News : सातारा शहराची अर्थवाहिनी समजल्या जाणाNया व्यापारी सहकारी पतसंस्थेने सालाबादप्रमाणे सातारकरांना दर्जेदार दिवाळी फराळ माफक दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून 'व्यापारी लाडू चिवडा महोत्सव' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. हा उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर राबवण्यात येणार असल्याने सातारकरांना दिलासा मिळणार आहे.
व्यापारी पतसंस्था सभासदांच्या गरजा भागवत असतानाच विविध सामाजिक तसेच समाजहिताचे उपक्रम राबवत असते. संस्थेचे सभासद, ग्राहक आणि सर्व सातारकरांना ऐन दिवाळीत दिलासा देण्याचे काम 'व्यापारी लाडू चिवडा महोत्सव' या उपक्रमाद्वारे करत आहे. दर्जेदार अशा हरभरा डाळ, बेसन, तेल, साखर, शेंगदाणा, पोहे यापासून हा लाडू चिवडा बनविण्यात येतो. दर्जाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. मजुरी, विक्री व्यवस्था यामध्ये वाढ झालेली असताना सुद्धा लाडू - चिवडा प्रत्येकी केवळ १४४ रूपये प्रती किलो या दराने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
गुरूवारी महोत्सवाचा शुभारंभ
संस्थेचे संस्थापक चेअरमन गुरुप्रसाद सारडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गेल्या १७ वर्षांपासून राबवला जात असून यंदाचा लाडू चिवडा महोत्सव दि. २८ ऑक्टोबर ते दि. ६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी (दि. २८) सकाळी १० वाजता गुरुप्रसाद सारडा यांच्या हस्ते आणि चेअरमन दिलीप पिलके, व्हाईल चेअरमन शिवप्रसाद मिणीयार व सर्व संचालक, कर्मचारी यांच्या उपस्थितीत मे. प्रभाकर राऊत मिठाईवाले, मल्हार पेठ, सातारा येथे होणार आहे. लाडू चिवडा विक्रीची संपूर्ण व्यवस्था भरतशेठ राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या उपक्रमाचा सातारकरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या