Marathi Literature : चक्रव्यूह लेखकच भेदू शकतात - कसबे


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक ग्रंथ पारितोषिकांचे दिमाखात वितरण

पुणे : देश, देशाची राज्यघटना आणि लोकांचे खरे बोलण्याचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. सर्वसामान्यांना खरे बोलण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. एका अनामिक भीतीखाली लोक खरे बोलत नाहीत. शेतकरी वर्षभर शांततेत आंदोलन करतात, कामगार रस्त्यावर आहेत. कोणी कोणाला समजून घेत नाही, कोणी कोणाला समजून सांगण्याच्या फंदात पडत नाही. यामुळे देशात लोकशाहीविरोधी प्रचंड कोंडी झाली आहे. ती कोंडी फक्त लेखकच फोडू शकतो. यासाठी आता लेखकांनी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक ग्रंथ पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम होते. 

पुणे येथील एसेम जोशी सभागृहात झालेल्या या समारंभात दोन वर्षाचे जीवनगौरव व ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट व डॉ. न. म. जोशी यांचा जीवनगौरव पुरस्काराने, तर कोल्हापूरचे डॉ. सुनीलकुमार लवटे व इंदोरचे  मोहन रेडगावकर यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

वार्षिक ग्रंथ पुरस्कारांचेही वितरण

तसेच यावेळी विविध गटातील वार्षिक ग्रंथ पुरस्कार देण्यात आले. यामध्ये कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्या 'शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती' या पुस्तकाला ज. रा. कदम पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार रावसाहेब पुजारी यांनी स्वीकारला. तसेच इचलकरंजीच्या राजेंद्र मुठाने यांना मसाप कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या