कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजमध्ये वाड्.मय मंडळ व वाचन कट्ट्याचे उद्घाटन
कोल्हापूर : प्रत्येकाला वाचनाची भूक असली पाहिजे. माणसं ओळखायची असतील तर वाचन महत्त्वाचे आहे. जीवनाला गेयता आणि लयबध्दता येण्यासाठी साहित्याची गरज असते. साहित्यिक अनुभवांना घट्ट धरुन ठेवतात. त्यामुळे साहित्यिक आणि साहित्य हे एकरुप झालेले असते. कवीला आनंद इतरत्र शोधावा लागत नाही. तो त्याला कवितेतूनच मिळतो. आजच्या काळात जग विविध समस्यांमुळे कुरुप झाले आहे. अशा जगाला सुंदर करण्याचे काम कविता आणि साहित्य करीत असते, असे विचार प्रसिध्द गझलकार डॉ. सुनंदा शेळके यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयातील वाड्मय मंडळ आयोजित वाड्.मय मंडळ व वाचनकट्टा उद्घाटन कार्यक्रमात 'काव्यरंग' या विषयावर त्या बोलत होत्या. याप्रसंगी त्यांनी गझल आणि कवितांचे सुरेख आवाजात सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.
वाचनाचा संस्कार विद्यार्थ्यांनी जपावा
जीवनाचा अर्थ कळण्यासाठी साहित्य महत्त्वाचे असते. बदललेले जग आणि माणसांची ओळख वाचनातून होते. वाचनाचा संस्कार आपल्या परंपरेत पाहायला मिळतो. हा संस्कार विद्यार्थ्यांनी जपला पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्यनिर्मितीचे बीज रोवण्याचे काम महाविद्यालयातून आणि अशा कार्यक्रमातून होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपली कौशल्ये विकसित केली पाहिजेत, असे विचार प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अध्यक्षीय मनोगतात मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक वाड्मय मंडळ प्रमुख डॉ. प्रभा पाटील यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. कविता तिवडे यांनी करुन दिली. आभार डॉ. प्रदीप पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. या कार्यक्रमास IQAC समन्व्यक डॉ. श्रुती जोशी, डॉ. दीपक तुपे, विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या