चिखलीचा आशिक दोन तासात जेरबंद; जिल्हा कारागृहात रवानगी
Satara News : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या रोडरोमिओला उंब्रज पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात त्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. प्रणित प्रमोद माने (वय १९, रा. चिखली, ता. कराड) असे त्याचे नाव आहे.
याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांनी अटकेची कारवाई केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
रोडरोमिओंची माहिती पोलिसांना द्या
आपल्या मुली शाळा - महाविद्यालयात जात - येत असताना त्यांना कोणी त्रास देत असेल, कोणी रोडरोमिओ त्यांचा पाठलाग करत असेल, विनाकारण छेडछाड करत असेल, त्यांना टाँट मारत असेल, रस्ता अडवत असेल तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्याशी ९६२३९६१००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच रोडरोमिओगिरी करणाऱ्या व्यक्तिंची माहिती अन्य नागरिकांना मिळाल्यास अगर दिसून आल्यास त्यांनीही अशा रोडरोमिओंची माहिती, त्यांच्याकडील वाहनांचा क्रमांक उंब्रज पोलीस ठाणे (०२१६४ - २६४०३३) किंवा वरील मोबाईल क्रमांकावर द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या