महिलेला अटक; १ लाख ६० हजार रूपये किंमतीचे पावणेपाच तोळे सोने जप्त
Satara News : मैत्रीच्या भावनेला तडा देणारी घटना साताऱ्यात घडली असून केवळ चोरीसाठी मैत्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून चोरीचे सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे पावणेपाच तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहे. हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघडकीस आणला. सीमा संजय कोकरे (वय ४०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
सातारा येथील गुरुवार पेठेतील अर्चना अपार्टमेंटमधून १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता पावणे पाच तोळे सोने चोरीस गेले होते. या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी आणि कर्मचारी तपास करत असताना त्यांना ही चोरी एका सराइत महिलेने केली असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी सीमा कोकरे हिला ताब्यात घेतले. महिला पोलिसांसमक्ष तिच्यावर पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर तिने चोरीचा गुन्हा कबूल केला. घरात ठेवलेले सोन्याचे गंठण, राणी हार असे सव्वा चार तोळे वजनाचे १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
मुंबईसह सातारा परिसरात गुन्हे
पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, उपनिरीक्षक समीर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, सागर गायवाड, विक्रम माने यांनी ही कारवाई केली. सीमा कोकरेवर मुंबई, सातारा शहर, शाहूपुरी पोलीस ठाणे, सातारा तालुका पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ही महिला चोरीसाठी भाड्याने खोली घेऊन राहत असे. ओळखीनंतर घर मालक किवा आजूबाजूच्या परिसरात श्रीमंत व्यक्ती बघून त्या घरात डल्ला मारत असे. ती पतीपासून विभक्त असून, तिचा मुलगा सोलापूर येथे टेम्पोचालक म्हणून काम करतो.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या