Satara News : अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ‘भाऊबीज’


सातारा जिल्ह्यातील ८ हजारावर लाभार्थ्यांना १ कोटी ६२ लाखांचे वितरण 

Satara News : सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची दिवाळी गोड व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने तातडीने त्यांना दिवाळीची भेट दिली असून, जिल्ह्यातील एकूण ८ हजार १४४ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना १ कोटी ६२ लाख ८८ हजार रुपयांची भाऊबीज देण्यात येत आहे.

जिल्ह्यात ३९३१ अंगणवाड्या व ८७९ मिनी अंगणवाड्या आहेत. त्यावर ८ हजार १४४ सेविका आणि मदतनीस काम करतात. त्यांना शासनाकडून दरमहा मानधन दिले जाते. मात्र तसे ते तुटपुंजेच असते. अर्थात अनेक वेळा हे मानधनही त्यांना वेळेत मिळत नाही. बहुतेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सामान्य कुटुंबातील असतात. त्यांना वेळेत मानधन मिळण्याची गरज असते. यासाठी त्यांना कायम झगडावे लागते. शासनाच्या वतीने काही वर्षापूर्वी भाऊबीज म्हणून फक्त ५०० रुपये दिले जायचे. मात्र गेल्या काही वर्षापासून दोन हजार रुपये भाऊबीज दिली जाते.

बँक खात्यावर रक्कम जमा 

अर्थात ही भाऊबीज त्यांना कधीच दिवाळीत मिळत नव्हती. दिवाळी संपली तरी त्यांना अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत असायची. मात्र यावर्षी शासनाकडून निधी उपलब्ध होताच जिल्हा परिषदेतून अंगणवाडी सेविकांसाठीचा भाऊबीज निधी १ कोटी ६२ लाख ८८ हजार रुपये ११ पंचायत समित्यांकडे पाठविण्यात आला असून, अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या बँक खात्यावर भाऊबीज जमा होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांनी समाधान व्यक्त केले.

दिवाळीतच मिळण्यासाठी उपाययोजना 

अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना दिवाळीतच भाऊबीज मिळाली तर त्यांना ती सणासाठी खूप उपयोगी पडेल, या उद्देशाने त्यांना भाऊबीज रक्कम लगेच मिळावी अशी उपाययोजना शासनाने केली. त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत, असे महिला व बाल विकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या