त्रुटी व अनियमितता ठरली कारण; छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी गैरहजर
Satara News : अखेर त्रुटी व अनियमितता आहे हे मान्य करुन सातारा येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाचा विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा जाहीर केलेला कार्यक्रमच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. आता नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.
मतदार यादीमधील त्रुटी, सदोष मतदार यादी, निवडणूक कार्यक्रम, छाननीनंतर अर्ज मागे घेण्याची मुदत, त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा कालावधी हा सर्व प्रकार सभासद मतदारांवर अन्याय करणारा व त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याच्या हरकतीचा अर्ज संस्थेचे आजिव सभासद विजय मांडके यांनी दाखल केल्यानंतर अर्ज छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थित राहून त्यांनी श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पंचवार्षिक पार्श्वभूमीवर कार्यक्रम रद्द करण्याची लेखी शिफारस केली. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे.
राजेशिर्के, मांडकेंनी नोंदवले आक्षेप
विश्वस्त मंडळाच्या चार व कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी येत्या दि. २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार होते. विश्वस्त मंडळाच्या चार जागांसाठी नऊ अर्ज आले होते, तर कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी २३ अर्ज आले होते. अर्ज छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थित होते. त्यासंदर्भातील लेखी अर्ज छाननीवेळी उपस्थित असलेले उमेदवार सुहास राजेशिर्के व विजय मांडके यांनी दिले आहेत. त्याचे प्रोसिडिंगही मागितले आहे. त्रुटी असल्याची लेखी तक्रार संस्थेचे आजिव सभासद विजय मांडके यांनी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एकदाही श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयात उपस्थित न राहता त्यांनी निवडणूकच रद्द केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या