दिवाळी साधेपणाने, प्रदूषणमुक्त साजरी करण्यााचे शंभूराज देसाईंचे आवाहन
Satara News : कोरोना संसर्गाचा धोका कमी झाला असला तरी यंदाची दिवाळी प्रत्येकाने आनंदात पण साधेपणाने साजरी करावी, आरोग्याची काळजी घ्यावी व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. कुठेही गर्दी होणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. यंदाची दिवाळी साजरी करताना आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करा
दिवाळी सण दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करताना फटाके फोडणे टाळावे. फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम श्वसनावर होतो. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करताना दिव्यांची आरास करुन हा उत्सव साजरा करावा, असे आवाहनही देसाई यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या