राज्यातील पहिल्या प्रकल्पास राज्य शासनाची मान्यता; १६ लाख मंजूर
Satara News : सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कराड) येथे राज्यातील पहिला प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून या प्रकल्पासाठी १६ लाख इतका निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. हा प्रकल्प लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या समन्वयाने यशस्वीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विघटन न होणारा प्लास्टिक कचरा ही पर्यावरणासह मानवी जीवनासाठी खूप गंभीर समस्या बनली आहे. मानवी जीवनास घातक ठरणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या पुढाकाराने राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास मसूर गावाचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखडा सादर करण्यात आला होता. राज्य शासनाने त्याला मान्यता दिल्यामुळे तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे. राज्यातील हा पहिला प्रकल्प सातारा जिल्ह्यात होत असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले.
प्रक्रिया करून होणार पुनर्वापर
संपूर्ण देशात प्लास्टिक वापरावर बंदी असून जिल्ह्यातील गावांमध्ये ग्रामपंचायतींकडून प्लास्टिक वापराबाबत दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. गावांमधून प्लास्टिक कचरा जमा करून, त्याचे वर्गीकरण करून क्रशिंग करणे तसेच त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला पुनर्वापरासाठी तयार करणे यासाठी जिल्हा परिषदेने सर्व तालुक्यांमध्ये असा प्रकल्प उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत मसूरचा प्रकल्प होत असून लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या समन्वयाने हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येईल, असे विनय गौडा यांनी सांगितले.
मसूरला प्रकल्प होत असल्याचा आनंद
जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या व यात्रा - बाजार ठिकाणांच्या गावांमध्ये प्लास्टिक कचरा ही समस्या निर्माण झाली असून त्यामुळे जलजन्य आजार निर्माण होऊ लागले आहेत. प्लास्टिक विघटन होत नसल्याने शेतीचे नुकसान होत असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. प्लास्टिक जाळल्याने त्यामधून विषारी वायू निर्माण होऊन श्वसनाचे आजार होत आहेत. यासाठी मसूर येथे प्लास्टिक कचऱ्यावर प्रकिया करुन त्याचा पुनर्वापर होण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा मानस होता. त्यास मंजुरी मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया मानसिंगराव जगदाळे यांनी व्यक्त केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या