दिशा अॅकॅडमीच्या ‘गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ सोहळ्यात विद्यार्थ्यांना भावनिक साद
Satara News : आपल्या आईवडिलांच्या, शिक्षकांच्या कष्टाचा विसर पडू देवू नका. जिद्द, चिकाटी, प्रयत्न या तीन गोष्टी सोडू नका, असे भावनिक आवाहन वाईतील दिशा अॅकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केले. भविष्यात 'दिशा'तील विद्यार्थी उच्च पदावर काम करताना दिसतील, असा विश्वास प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रवीण ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
वाई येथील दिशा अॅकॅडमीचा यंदाचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा नुकताच वाई येथील चित्रा टॉकिजमध्ये उत्साहात पडला. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. विजय पवार, कोचिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी आलोक दीक्षित, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, वारणानगरच्या एबीपी शिक्षण संस्थेचे संस्थापक ए. बी. पाटील, प्रा. डॉ. प्रशांत कुलकर्णी, प्रा. विनायक परिचारक, डॉ. हर्षद सांगळे, अमोल बिजवे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालक, मार्गदर्शकांसह मान्यवरांचा सत्कार
प्रारंभी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले हिंदुस्थानचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी तसेच सहकाऱ्यांना दिशा परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. दिशाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम आणि संचालिका प्रा. रुपाली कदम यांनी शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार केला. अहवालवाचन प्रा. रुपाली कदम यांनी केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर होतकरु गुणवंत विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. तसेच आयएएस सचिन लांडे, कृष्णा नदी सेवाकार्य फाऊंडेशन सदस्य, नगरसेवक भरत खामकर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन करत पालक, विद्यार्थी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१२० विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
सामाजिक भान जपत १२० विद्यार्थ्यांना नीट, जेईईसाठी दिशा मोफत मार्गदर्शन करणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन कदम यांनी यावेळी सांगितले. शैक्षणिक प्रवासात मिळालेले प्रोत्साहन, गुणगौरव, सत्कार नेहमीच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवतात. यशाच्या दिशेकडे प्रवास करण्यासाठी मिळालेली ही एक प्रेरणा, सकारात्मक बळच होय. यासाठीच दिशा अॅकॅडमी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते, असे त्यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या