दहावीनंतरच्या शिक्षणासाठी सुपर ३० बॅचमध्ये मिळणार मोफत प्रवेश
Satara News : दहावीनंतर करिअरचे क्षेत्र म्हणून सायन्स शाखेची निवड विद्यार्थी करत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी वाईतील दिशा अॅकॅडमीने बुद्धीचा कस लावत 'डी-सॅट परीक्षे'च्या माध्यमातून दीड लाखापर्यंतची स्कॉलरशिप व सुपर ३० बॅचमध्ये मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
डी-सॅट म्हणजे दिशा स्कॉलरशिप कम अॅडमिशन टेस्ट एक्झाम होय. यात दहावीत शिकणारे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. ही परीक्षा इयत्ता नववी, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. डी-सॅट परीक्षा दोन स्टेजेसमध्ये होणार आहे. स्टेज - १ मधील पात्रता निकषांची पूर्तता करणारे विद्यार्थी दहा हजार रूपयांपासून दीड लाखांपर्यंतची स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्र ठरतील. स्टेज-१ परीक्षा २३ जानेवारी रोजी होणार असून ती ऑनलाईन स्वरूपाची आहे.
स्टेज-२ मधील पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिशाच्या सुपर ३० बॅचमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे ११ वी, १२ वी या दोन्ही वर्षांचे मोफत शिक्षण, आयआयटी - जेईई किंवा नीटच्या प्रत्येक बॅचसाठी ३० विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. स्टेज-२ परीक्षा २९ व ३० जानेवारी रोजी होणार असून ती ऑफलाईन स्वरूपाची आहे.
बारावीनंतरच्या प्रवेशासाठी सहकार्य
डी-सॅट मधून पुढे आलेले १२० विद्यार्थी सायन्स क्षेत्रात निश्चितच उत्तम कामगिरी करतीत. प्रत्येक विद्यार्थी घडवताना आमच्या अनुभवी, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना सुपर ३० बॅचमधून मिळत राहील. याशिवाय दिशा विद्यार्थ्यांसाठी १० ते १२ तासांचे वेळापत्रक तयार करते. कौन्सिलिंग, फॉलोअप, मेन्टॉर टीम यामुळे दिशाचे विद्यार्थी पुढे पुढे जात राहतात. शिवाय बारावीनंतरच्या शैक्षणिक प्रवेशासाठी १०० टक्के सहकार्य करण्यासाठी दिशा कटिबद्ध असल्याचे दिशाचे संस्थापक प्रा. डॉ. नितीन कदम यांनी सांगितले.
रजिस्ट्रेशन कोठे व कसे करावे ?
दिशा अॅकॅडमी वाई आणि बारामती शाखेतील प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांची स्वतंत्र निवड करणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही मोलाची संधी ठरणार आहे. डी-सॅट या दिशा स्कॉलरशीप कम अॅडमिशन टेस्ट एक्झामसाठी १० वीतील विद्यार्थ्यांनी ७७७५९२५९२३ या क्रमांकावर किंवा www.dishaacademy.org वर रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Career After 10 th Standard
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या