खिरखंडीच्या मुला-मुलींना मदतीसाठी धावून आले असंख्य हात
Satara News : शिक्षणासाठी शिवसागर जलाशयातून लाकडाच्या होडीतून जीवघेणा प्रवास करणाऱ्या जावली तालुक्यातील खिरखंडी येथील मुलामुलींसाठी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वखर्चाने यांत्रिक बोट उपलब्ध करुन दिली. कधी नव्हे ते प्रथमच या विद्यार्थ्यांनी या बोटीतून प्रवास करत शाळा गाठली.
खिरखंडीतील मुलींच्या जीवघेण्या प्रवासाची कहाणी माध्यमांतून जगासमोर आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही या विषयाची दखल घेतली. दुर्गम बामणोली खोऱ्यातील खिरखंडीतून कोयना जलाशय पार करत पुन्हा अंधारीपर्यंत चार - पाच किलोमीटरचा घनदाट जंगलातील वाट तुडवत या मुली शाळेत पोचत होत्या. ही परिस्थिती पाहून मूळ दरे गावी आलेल्या मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी तत्काळ या मुलींना रोज शाळेत कोयना जलाशय पार करुन सकाळी आणि संध्याकाळी सोडण्यासाठी यांत्रिक बोट उपलब्ध करुन दिली.
सुहास राजेशिर्के यांचे दातृत्वखासदार शिंदे यांनी खिरखंडीला भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. या बोटीमुळे मुलींचा रोजचा होडी चालवण्याचा त्रास कमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही मुलींना फायबर बोट उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दातृत्त्वाची प्रचिती देत अलीकडेच या विद्यार्थ्यांना लाइफ जॅकेट उपलब्ध करुन दिली आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या