Callar Tune News : कोरोनाची कॉलर ट्यून होणार लवकरच बंद


महामारी आटोक्यात आल्याने आणि पुरेशी जागरुकता आल्याने सरकारचे पाऊल

नवी दिल्ली : ‘नमस्कार, आप सबके साथ और सबके प्रयाससे...’ देशभरात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून तुमच्या आमच्या मोबाईलवर सक्तीने ऐकावी लागत असलेली ही कोरोनाविषयी जनजागृती करणारी कॉलर ट्यून आता बंद होणार आहे. कोरोनाच्या संकटातून देश बाहेर पडत असल्याने आणि देशवासीयांमध्ये याविषयी पुरेशी जाणीव जागृती निर्माण झाली असल्याने या कॉलर ट्यूनपासून लवकरच सुटका होणार असल्याचे संकेत आहेत.

कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर सरकारमार्फत मोबाईलवर जनजागृतीसाठी उपरोक्त कॉलर ट्यून वाजवली जात होती. कोरोनाच्या नियमांबाबत जागरुक करणाऱ्या अशा संदेशाची कॉलर ट्यून हटवण्याबाबत सरकारने विचार केला आहे. यासंदर्भात दूरसंचार विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्रव्यवहार केला आहे.

लोकांची होणार गैरसोयीतून सुटका

देशात कोरोना आटोक्यात आला असून दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट आली आहे. तसेच मृत्यूदरही घटला आहे. जनतेमध्ये कोरोनाविषयी पुरेशी जागरुकता निर्माण झाली आहे. असे असुनही मोबाईल कॉलपूर्वी कोरोनाची कॉलर ट्यून ऐकवली जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाच्या कॉलला उशीर होतो. घाईगडबडीच्या वेळी पटकन कॉल लागत नाही. याबाबत तक्रारी आल्यानंतर सरकारने कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या