बेकायदा मटका - जुगार चालवणाऱ्या टोळीला शाहूपुरी पोलिसांचा दणका
Satara News : सातारा शहरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा मटका - जुगार चालवणाऱ्या चारजणांना सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख यासीन इक्बाल शेख (वय ३८, रा. गुरुवार परज, गुरुवारपेठ, सातारा), टोळी सदस्य इनायत मोहम्मदअली शेख (वय ४७, रा. ६३५ गुरुवार पेठ, सातारा), राजन अशोक सांडगे (वय २६, रा. ४१७ मंगळवारपेठ, सातारा) व जयसिंग हणमंत भोसले (वय ६५, रा. २१ केसरकरपेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
ही टोळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा मटका जुगार चालवित होती. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करुन, अटक करुन सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांच्या उपद्रवामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी जनतेतून होत होती. त्यामुळे या ४ इसमांना हद्दपार करण्याबाबत हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस प्रमुग अजय कुमार बन्सल यांच्याकडे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीचा आदेश केला आहे.
आजअखेर १०७ जणांवर कारवाई
याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून २९ प्रस्तावातील बेकायदेशिर कारवाया करणाNया १०७ इसमांना हद्दपारीचे आदेश दिले आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या