Satara News : वणवे लावणाऱ्यांना प्रत्येकी ३ हजारांचा दंड


जावलीतील आखेगणी, कुरळोशीच्या घटनांबद्दल मेढा न्यायालयाकडून शिक्षा

Satara News : जावली तालुक्यात डोंगराला वणवे लावण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमधील आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी तीन हजार रूपयांचा दंड ठोठावला. आजच्या प्रकरणातील आरोपीस दंडाशिवाय कोर्ट उठेपर्यंतची शिक्षाही सुनावण्यात आली.

हुमगावजवळील आखेगणी येथील वनक्षेत्रात २० मार्च रोजी वणवा लागला होता. त्या गुन्ह्याच्या अधिक तपासात हा वणवा मौजे विवरमधील राजाराम शंकर धनावडे याने लावल्याचे तपासात सिद्ध झाले. याप्रकरणी वन विभागाच्या वतीने आज मेढा न्यायालयात केस दाखल करण्यात आली. आरोपीस न्यायालयाने नुकसान भरपाईसह तीन हजार रूपयांचा दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली.

वन विभागाकडून कारवाया 

दुसऱ्या घटनेत केळघरजवळील कुरळोशी येथील वनक्षेत्रात लागलेला वणवा सुलोचना लक्ष्मण पाटील यांनी लावल्याचे निष्पन्न झाले. मेढा न्यायालयाने त्यांना नुकसान भरपाईसह तीन हजार रूपयांचा दंड ठोठावला. दोन्ही कारवाया उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक एस. व्ही. सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली मेढ्याचे वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी, वनपाल आर. एस. शेख, आर. ए. परधाने, केळघरच्या वनरक्षक कु. एम. बी. कुटे यांनी केली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या