शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाठलाग करुन आवळल्या मुसक्या
Satara News : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून बेकायदा देशी - विदेशी दारुची मोटारसायकलवरुन वाहतुक करणाऱ्यास पाठलाग करुन पकडून त्याच्याकडून एकूण ५४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी होळी व धुलीवंदनाच्या सणाच्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारु विक्री, वाहतुकीवर कारवाया करण्याबाबत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना सूचना दिल्या होत्या.
न थांबल्याने संशय बळावला
आज पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना बुधवारनाका ते बाबर कॉलनी, करंजे रोडने एक इसम मोटारसायकलवरुन बेकायदेशीर देशी विदेशी दारुची वाहतुक करणार असल्याची बातमी मिळाली. या बातमीच्या अनुषंगाने पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करुन छापा कारवाईबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बुधवारनाका ते बाबर कॉलनी, करंजे रोडने विसर्जन तळ्याजवळ सापळा लावला. मिळालेल्या बातमीप्रमाणे दुपारी पाऊणच्या सुमारास एक इसम बुधवारनाका बाजुकडून ॲक्टिव्हा गाडीवरून पोत्यामध्ये काहीतरी घेवून येताना दिसला. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला. परंतु तो न थांबता तसाच पुढे जावू लागल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले.
५४ हजारांचा मुद्देमाल जप्त
त्याच्याकडील पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये १४ हजार ८६० रुपये किमतीच्या विदेशी दारु मॅकडॉनल नंबर 1 विस्की, विदेशी दारु इंम्पेरियल ब्लु, देशी दारु मनोरंजन संत्रा, टँगो पंच अशा देशी विदेशी दारुच्या एकूण ३१६ क्वार्टर व मोटारसायकल असा एकूण ५४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी ही कारवाई केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या