सोमवारपासून अर्ज; ३ मे रोजी मतदान... ५ मे ला मतमोजणी
Satara News : वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवार दि. २८ पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दि. ३ मे रोजी मतदान होणार असून दि. ५ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
वैभवकाळ पाहिलेला किसन वीर सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे गळीत हंगाम सुरू होऊ शकलेला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या ऊसाचे चिपाड होऊ लागले आहे. मागील हंगामातील ऊसाचे पैसेही अडकले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत सापडला आहे. कारखान्यातील कामगारांचे पगारही दोन वर्षात झालेले नसल्याने त्यांचीही ससेहोलपट झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे.
मनोहर माळी निवडणूक निरीक्षक
निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील महिन्यात कारखान्याची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी निवडणूक कार्यक्रम अंतिम केला आहे.
निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे...
सोमवार दि. २८ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दि. ४ एप्रिलला दाखल अर्जांची छाननी होईल. तेथून पुढे १५ दिवस म्हणजे दि. १९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. दि. ३ मे रोजी प्रत्यक्ष मतदान होईल. दि. ५ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या