Satara News : अधिसूचना निघेपर्यंत पत्रमोहीम सुरूच ठेवणार


'विद्यार्थी दिवस’ साजरा करण्याच्या राष्ट्रपतींच्या घोषणेचे स्वागत - अरूण जावळे

Satara News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा व्हावा यासाठी १५ वर्षे महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७ नोव्हेंबर हा दिवस देशभर साजरा करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रपतींच्या या घोषणेचे स्वागत आहेच, परंतु जोपर्यंत केंद्र शासन अधिकृत अधिसूचना काढत नाही, तोपर्यंत पत्र मोहीम सुरुच ठेवणार असल्याचे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक, साहित्यिक अरुण जावळे यांनी म्हटले आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षक दिन व डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने वाचन प्रेरणा दिन देशभर साजरा केला जातो. तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण देशात विद्यार्थी दिवस का साजरा व्हायला नको? असा प्रश्न उपस्थित करुन अरुण जावळे यांनी म्हटले आहे की, ज्या हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतला, त्या हायस्कूलकडेही केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, अलीकडच्या काळात हे हायस्कूल खूप चर्चेत आले असून ते पाहण्यास देशविदेशातून लोक येत असतात. हे हायस्कूल ऐतिहासिक ठेवा असल्याने तो जतन करणे आवश्यक आहे. 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हणून ज्यांना जगात संबोधले जाते आणि जगातील सर्वांत हुशार विद्यार्थी म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या हायस्कूलचे विद्यार्थी होत. त्यामुळे या छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलला महत्त्व आहे.


... तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही !
 

खरे तर समाजाला प्रेरणा देण्याच्या दृष्टीने तसेच शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच 'विद्यार्थी दिवस' हा अत्यंत महत्त्वाचा ऊर्जादायी दिवस आहे. समृद्ध, शक्तिशाली देश उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबांच्या, दलित - वंचितांच्या आणि एकूणच सर्व समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल, तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पाहायचे असेल, तर 'विद्यार्थी दिवस' देशभर होणे महत्वाचे आहे, असे स्पष्ट करत सातारचा हा 'विद्यार्थी दिवस' देशभर होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचेही साहित्यिक अरुण जावळे यांनी म्हटले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या