Satara News : कार्वे, साकुर्डीत जिल्हा बँकेची एटीएम सेवा सुरू


सातारा जिल्हा बँकेच्या एटीएममुळे ग्राहकांना जलद सेवेचा लाभ - बाळासाहेब पाटील
 

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासामध्ये बहुमोल योगदान देत असून बँकेच्या एटीएम सेवेमुळे अत्याधुनिक व जलद सेवेचा लाभ ग्राहकांना होत असल्याचे प्रतिपादन बँकेचे संचालक व राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कराड तालुक्यातील कार्वे तसेच साकुर्डी येथील एटीएम सेवेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदिप विधाते, लहुराज जाधव, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, राजेश पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, बँकेचे अधिकारी / कर्मचारी तसेच कराड पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी तसेच परिसरातील ग्राहक उपस्थित होते.

ग्राहक सक्षम होण्यासाठी अग्रेसर

जिल्हा बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल नाबार्डचे सलग सहा व इतर नामांकित संस्थांचे ९९ पुरस्कार मिळालेले आहेत. बँकेने सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केला आहे. बँकेचा नावलौकिक असाच कायम रहावा यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. बँक शहरी व ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली असून विविध प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागातील ग्राहक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँक नेहमीच अग्रेसर भूमिका घेवून कामकाज करत आहे, असे अध्यक्ष नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले.

सहकार क्षेत्रातील काही ठराविक बँका राष्ट्रीयकृत / खासगी बँकांच्या बरोबरीने सेवा देत असून यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा देत आहे. त्यामुळे बँकेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकेच्या कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जात नाही. बँक आर्थिकदृष्ट्या भक्कम असल्याचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी सांगितले.

बँकेला स्थापनेपासून ‘अ’ वर्ग  

बँक स्थापनेपासूनच 'अ' ऑडीट  वर्गामध्ये असून बँकेने कोअर बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना आरटीजीएस / एनईएफटी, मोबाईल बँकिंग यासारख्या आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच अधिकाधिक सामान्य ग्राहकांपर्यंत बँकिंग सुविधा मिळाव्यात याकरिता शहरी व ग्रामीण भागात शाखा व एटीएम कार्यान्वित केल्या आहेत, असे डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या