कडक कारवाई करण्याचा मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांचा इशारा
Satara News : वाई येथील औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या कचरा डेपोबाहेर कचरा टाकणाऱ्या व्यक्ती व वाहनचालकांवर नगरपालिका प्रशासन स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने कडक कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांनी दिला आहे.
सोनापूर शेती याठिकाणी असलेल्या नगरपालिका कचरा डेपोमधील धुराचे लोट, तसेच मुख्य रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे सुलतानपूर, लोहारे, बोपर्डी परिसरातील ग्रामस्थांना, तसेच एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या कामगार व नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. नगरपालिका प्रशासनाने कायमचे निर्बंध घालून कडक कारवाई करावी, यासाठी लोहारेचे माजी उपसरपंच दत्तात्रय ढेकाणे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी मोरे यांना लेखी तक्रार दिली.
परिसराला बकाल स्वरूप
शहरालगतच्या काही ग्रामपंचायती कचरा गाड्या अनधिकृतपणे आणून कचरा डेपोत टाकतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कचरा डेपोच्या बाहेरील रस्त्यावर काळूबाई मंदिर ते शवविच्छेदनगृह परिसरात शहर व परिसरातील मटण, चिकन विव्रेâते, काही हॉटेल व्यावसायिक, एमआयडीसीत जाणारे काही कामगार कचऱ्याच्या पिशव्या टाकून भर घालत आहेत. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप आले असून घाणीमुळे दुर्गंधी पसरत आहे. अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
वाई एमआयडीसीलगतचा कचरा डेपो ७२ वर्षापासून कार्यरत आहे. सद्यस्थितीत ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. ओल्या कचऱ्यावर खत प्रक्रिया करण्याचे काम गतिमान आहे, परंतु काही विघ्नसंतोषी कचऱ्याला आग लावून वातावरण प्रदूषित करत आहेत. डेपो परिसरात अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्या व्यक्ती व वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या