Sanjay Raut News : संजय राऊत रविवारी पाटण तालुक्यात


शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी तळमावलेत शिवसंवाद मेळावा 

Sanjay Raut News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत रविवारी (दि. २५) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ढेबेवाडी खोऱ्यातील तळमावले येथे आयोजित शिवसंवाद मेळाव्यात त्यांची तोफ धडाडणार आहे.

अलीकडेच सातारा येथे खासदार संजय राऊत यांची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली होती. त्यावेळीच जिल्ह्यातील शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी लक्ष घालणार असल्याचा शब्द खासदार राऊत यांनी दिला होता. त्याला अनुसरूनच त्यांचा रविवारचा दौरा निश्चित झाला आहे. 

मुलुख मैदान तोफेचा धसका 

शेलक्या शब्दात विरोधकांचा समाचार घेणाऱ्या आणि विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या शिवसंवाद मेळाव्यातील भाषणाकडे कराड, पाटण तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हा शिवसंवाद मेळावा शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात होत असल्याने देसाई गटाच्या पोटात गोळा उठला असून खासदार राऊत यांच्या भाषणाबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे

कराड, पाटणमध्ये भगवे वादळ 

खासदार राऊत यांच्या दौऱ्याची सुरुवात कराड तालुक्यातून होणार असून सकाळी अकरा वाजता बनवडी येथे इंद्रजीत गुजर यांच्या दौलतराव आहेर कॉलेजला सदिच्छा भेट, दुपारी एक वाजता पाडळी (केसे) येथे शाखेचे उद्घाटन, त्यानंतर सुपने गावचे उपसरपंच अजित जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी तीन वाजता पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा, त्यानंतर येरवळे (ता. कराड) येथे शहीद जवान सुरज यादव यांच्या घरी सांत्वनपर भेट असे कार्यक्रम असून दुपारी चार वाजता ढेबेवाडी खोऱ्यातील तळमावले येथे शिवसंवाद मेळावा होणार आहे. शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे - पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख शेखरभाऊ गोरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे असे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी सांगितले.

Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray), Shambhuraj Desai, Nitin Banugade - Patil

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या