युथ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
Satara Boxing News : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालय आणि सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीच्या दोन महिला खेळाडूंनी नागपूर येथे झालेल्या १९ व्या युथ राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत २ सुवर्णपदके पटकावली. त्यांची भोपाळ येथे होणार्या सहाव्या युथ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
कु. वृषाली करंजे (७० ते ७५ किलो) आणि कु. मानसी लाड (७५ ते ८१ किलो) या दोन खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. या दोघींची २६ जून ते २ जुलै २०२३ या कालावधीत भोपाळ येथे होणार्या सहाव्या युथ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, संघ प्रशिक्षक यासर मुलानी, अमरीश देवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, क्रीडा शिक्षक डॉ. उदय शिंदे, तुषार पवार, आकाशी पाटील, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा, अॅकॅडमीचे पदाधिकारी जगन्नाथ जगताप, हरीश शेट्टी, अमर मोकाशी, रवींद्र होले, संजय पवार, तेजस यादव, बापूसाहेब पोतेकर, डॉ. राहुल चव्हाण आदींनी अभिनंदन केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या