खोदकामाची सातारकरांना डोकेदुखी; सोशल मीडियावर टिंगल
Satara News : सातारा शहरातील प्रतापगंज पेठेत केलेल्या नवीन रस्त्याचे दैन्य दुसऱ्या दिवसापासूनच दिसू लागले असून वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना चंद्रावरून चालण्याचा फील येत आहे. त्यामुळे रस्त्यासाठी कोणते 'तंत्र' वापरले याची चर्चा सुरू असून सोशल मीडियावरूनही यावर मीन्स येऊ लागले आहेत.
शहरात भुयारी गटार योजनेसाठी गेले काही महिने रस्तोरस्ती खोदकाम सुरू होते. त्यामुळे वाहनधारकांनी, शहरवासीयांनी याचा भरपूर त्रास सोसला आहे. कधी एकदा हे काम पूर्ण होऊन चांगले डांबरी रस्ते तयार होतील याकडे शहरवासीयांच्या नजरा लागल्या होत्या. पण अलीकडे पाईपलाईन टाकून, खोदलेले चर मुजवून तयार केलेले रस्ते अजबच आहेत. गंभीर म्हणजे प्रतापगंज पेठेत संथ गतीने डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच एमएससीबीजवळ रस्त्यालाच मोठे भगदाड पडले होते. त्यातून कामाच्या दर्जाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पण रस्त्याचे दैन्य इथेच थांबले नाही. डांबरीकरणाचा मुलामा देऊन झाल्यानंतर दर्जाचा बुरखा दिवसागणिक फाटत चालला आहे.
सातारकर वाहनधारकांना मनस्ताप
पाईपलाईनसाठी जिथे चर खोदले होते, त्या ठिकाणचा रस्ता खचत चालला असून संपूर्ण रस्ता ओबडधोबड झाला आहे. रस्त्याला कुठेही लेव्हल दिसत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना चंद्रावरून चालल्याचा किंवा यात्रेतील झंपिंग झपांगचा अद्भुत फील येत आहे. खरे तर याचा वाहनधारकांना मनस्ताप होत आहे, पण सहनशील नागरिक निदान खड्ड्यातून तरी सुटका झाली म्हणून आनंद मानत आहेत.
प्रतापगंज पेठेतील रस्त्याच्या दर्जाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असून असे काम करणारा ठेकेदार कुठून शोधून काढला आणि या रस्त्यासाठी कोणते 'तंत्र' वापरले असे खोचक सवाल लोक करत आहेत. सोशल मीडियावरूनही हा रस्ता टीकेचा धनी झाला आहे.
डांबरीकरणाच्या दुसऱ्या दिवशीच खोदकाम
प्रतापगंज पेठेप्रमाणे बाजूच्या डेक्कन शाळा ते ऐक्य प्रेस रस्त्याचीही वाताहत झाली आहे. पाईपलाईनसाठी हा रस्ताही खोदला होता. काम पूर्ण झाल्यावर त्याचे डांबरीकरण झाले, तेही असेच दर्जाहीन. पण त्यावरही कळस म्हणजे डांबरीकरण केल्याच्या दुसऱ्या - तिसऱ्या दिवशीच हा रस्ता पुन्हा एकदा खोदला आहे. त्यामुळे या पेठेतील लोक अक्षरशः वैतागले आहेत. आता रस्त्याची दुरुस्ती तरी कधी होणार हेही सांगता येत नाही.
Pratapganj peth News
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या