होय, कोविड व्हॅक्सिन मोदी यांनीच तयार केली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Satara News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in America) अमेरिकेला गेल्यावर काहींनी मणिपूर सांभाळता येत नाही ते अमेरिकेला गेले असल्याची टीका केली होती. मात्र, मणिपूर सांभाळायला गृहमंत्री अमित शहा सक्षम आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. होय, कोविड व्हॅक्सिन मोदी यांनीच तयार केली आहे असा पुनरूच्चार करत, लसीचे रॉ मटेरियल काही ठराविक देशांमध्ये उपलब्ध होते. पण मोदींच्या संबंधामुळे ते आपणास मिळाले आणि शास्त्रज्ञांनी लस तयार केली असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
केंद्र सरकारच्या नवव्या वर्षपूर्तिनिमित्त कराड येथील कल्याणी मैदानावर भाजपचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्डचे वाटप फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कटोरा घेऊन फिरावे लागले असते
देशातील १४० कोटी लोकांना मोफत लस मोदींमुळेच मिळाली आहे. लस तयार झाली नसती तर अमेरिका व रशियासमोर लसीसाठी कटोरा घेऊन आपल्याला उभे राहावे लागले असते, असे सांगून फडणवीस यावेळी म्हणाले, मोदी सरकारची नऊ वर्षे देशाच्या परिवर्तनाची, विकासाची, सीमा सुरक्षिततेची, गरीब कल्याण अजेंडा राबवणारी यासह देशाच्या विकासाचा गोफ वेगाने पुढे नेणारी ठरली आहेत. या नऊ वर्षात सामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे. मोदींनी या नऊ वर्षात केलेल्या विकास कामात सामान्य माणसाला भागीदार केले आहे.
खासदार, आमदार भाजपचे व्हावेत
मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर जात आहे. मोदींचे प्रत्येक काम घराघरात पोहोचले पाहिजे. तरच साताऱ्यात २०२४ मध्ये भाजपचा खासदार व कराड दक्षिणमध्ये भाजपचा आमदार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अतुल भोसले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते केले, तर श्यामबाला घोडके यांनी आभार मानले.
Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadanvis
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या