सातारकर न्हाले भक्तिरसात; दिंडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश
Satara News : शाहुनगर (सातारा) येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 'नामदेव तुकाराम, जय हरी विठ्ठला'च्या गजरात हातात भगव्या पताका, भालदार, चोपदार, डोक्यावर तुळशी वृंदावन, आकर्षक पेहराव, झिम्मा फुगडीचा फेर, मृदुंग तुतारीचा निनाद, भव्य गजराजाची प्रतिमा, घोड्याचे आकर्षक रिंगण यामुळे गुरूकुलच्या दिंडीने उपस्थित शाहुनगरवासी व पालक यांची वाहवा मिळवली.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने गुरूकुल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने एका आगळ्यावेगळया दिंडीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश विद्यार्थ्यांमार्फत दिले. राजवाडा येथून ॲड. मिलिंद ओक, स्वाती ओक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून माउलींच्या पालखीचे पूजन करत दिंडीचा शुभारंभ करण्यात आला.
दिंडीच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या
यावेळी गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव आनंद गुरव, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सोनाली तांबोळी, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
ही दिंडी राजवाडामार्गे कमानी हौद, शेटे चौक येथून मोती चौक अशी आयोजित करण्यात आली होती. दिंडीच्या मार्गावर काढलेल्या सुबक आखीव रेखीव रांगोळीमुळे उत्साही वातावरण तयार झाले होते. दिंडीमध्ये एनसीसीचे विद्यार्थी व बँडपथक यांनी उत्कृष्टरीत्या संचलन करत दिंडीची शोभा वाढवली.
दिंडी सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
यावेळी मधुकर जाधव, अँड. राजेंद्र बहुलेकर, उदय गुजर, संजय कदम, जगदिश खंडेलवाल, नितीन माने, दीपक मेथा, राजेंद्र खंडेलवाल, हरिदास साळुंखे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरूकुलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थी वाहतुक करणारे कॅन अंकल यांनी शिस्तबध्द रीत्या नियोजन केले होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या