Satara News : विहेजवळ विहिरीत जीपला जलसमाधी


कराड - चिपळूण मार्गावर दुर्घटना; चालकाचा मृतदेह सापडला
Satara News : मंगळवारी सायंकाळी कराड - चिपळूण मार्गावरील विहे गावाजवळ रस्त्याकडेच्या विहिरीत कोसळलेल्या क्रुझर जीपच्या चालकाचा मृतदेह आज सकाळी मिळून आला. संभाजी कृष्णा पवार (वय ५०, रा. मल्हारपेठ, ता. पाटण) असे मृताचे नाव आहे.
चालकाचा ताबा सुटल्याने ही भरधाव जीप उसाच्या शेतात घुसून पुढे पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. काही क्षणातच तिला जलसमाधी मिळाली. या घटनेमुळे विहे परिसरात सर्वत्र सन्नाटा पसरला होता. गाडीत नक्की किती लोक असतील याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.
... पण जीपमध्ये कोणीही नव्हते
रात्री भर पावसात जवळपास तीन तास प्रयत्न करून पोलिसांनी विहे ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त क्रुझर क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली. पण जीपमध्ये कोणीही नसल्यामुळे संभ्रम वाढला. अंधार व पावसामुळे रात्री विहिरीत शोध घेण्यात अडचणी आल्या. आज सकाळी साडेसातच्या सुमारास विहिरीतून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेत चालकाचा मृत्यू झाल्याने मल्हार पेठ गावावर शोककळा पसरली आहे.
Karad - Chiplun Road Accident 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या