Satara News : पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या गाडीला अपघात


गुजरवाडीतील एक ठार, ७ जखमी; ओव्हरटेकच्या प्रयत्नात चार कोलांट्या
Satara News : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडीला माण तालुक्यातील लोधवडेनजीक सकाळी आठ वाजता भीषण अपघात होऊन त्यात एक जण ठार, तर सात जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडीचे रहिवासी आहेत.
कल्याण भोसले (वय ४५) असे मृताचे नाव असून अण्णा गाढवे (वय ४२), पप्पू भिसे (वय ४०), दादासो थोरात (वय ४२), सागर भोसले, विजय माने (वय ४५), श्रीमंत पवार (वय ५०) व रुद्र भोसले अशी जखमींची नावे आहेत. त्यापैकी श्रीमंत पवार यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
लोधवडे फाट्यानजीक दुर्घटना 
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील पैलवान, प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे बोलेरो गाडी (एमएच ११ बीएच ०८९६) घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले होते. त्यांच्यासोबत इतर सातजण गाडीतून प्रवास करत होते. गोंदवले खुर्द गावाजवळ लोधवडे फाट्यानजीक त्यांची गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावरून गाडी उंच उडाली अन थेट चार वेळा पलटी होत एका रानात जाऊन पडली. यामध्ये गाडीतील सर्व भाविक जखमी झाले. 
जखमींवर सातारा येथे उपचार 
अपघाताची माहिती समजताच लोधवडे, संभाजीनगर येथील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले व गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्या ठिकाणी उपचार घेत असतानाच कल्याण भोसले यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. याच ठिकाणी गेल्या काही महिन्यांपूर्वी पळशी येथील तीन युवकांचाही भीषण अपघात झाला होता आणि त्यात ते तिघेही जण जागीच ठार झाले होते.
Satara - Pandharpur Road Accident 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या