Satara News : कांता शिंदे यांचे निधन


शिवसेना सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांना मातृशोक

Satara News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या मातोश्री कांता पुंडलिक शिंदे (वय ७८) यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कांता शिंदे या सर्वांना माई म्हणून परिचित होत्या. सातारा येथील चिपळूणकर शाळेत त्यांनी प्रदीर्घकाळ सेवा बजावली होती. प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख असलेल्या माईंविषयी सोमवार पेठेत आदराची भावना होती. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दि. ४ जुलै रोजी दशक्रिया विधी 

रविवारी संध्याकाळी संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी दि. ४ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता संगम माहुली (सातारा) येथे होणार आहे.

Satara Shivsena 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या