Satara News : फडणवीसांशी भेटीत काय घडले ?


उदयनराजे - शिवेंद्रराजे यांच्यात समझोता झाला की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह

Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बुधवारी जागेच्या मालकीवरून साताऱ्यात झालेल्या खडाजंगीची आग धगधगत असतानाच आज दोन्ही राजे कराडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र, या भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यातच राहिल्याने दोघांमध्ये समझोता करण्यात फडणवीस यशस्वी झाले की नाही हे समजू शकले नाही.

सातारा शहराजवळील खिंडवाडी हद्दीत बुधवारी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या सातारा बाजार समितीच्या नियोजित वास्तूचे भूमिपूजन आयोजित केले होते. त्याचवेळी खासदार उदयनराजे समर्थकांसह त्या ठिकाणी पोहोचले. संबंधित जागेच्या मालकी हक्कावरून तेथे वाद भडकाव त्यातून दोन्ही राजे समोरासमोर भिडले. त्यावेळी समर्थकांनी राडा केला. या प्रकरणामुळे सातारकरांसाठी कालचा दिवस तप्तच राहिला. या वादाकडे कमालीच्या गांभीर्याने पाहिले गेले. सातारा पोलिसांनी खासदार उदयनराजे व त्यांच्या समर्थकांवर यासंदर्भात गुन्हाही दाखल केला. त्यामुळे उदयनराजे विरुध्द शिवेंद्रराजे असा या दोन बंधूंमधील संघर्ष राज्यभर चर्चेचा विषय झाला.

स्वतंत्रपणे कमराबंद चर्चा; तपशील गुलदस्त्यात

या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री फडणवीस कराडला मुक्कामी असल्याने आज सकाळी दोन्ही राजांनी त्यांची कराड येथे स्वतंत्रपणे भेट घेऊन कमराबंद चर्चा केली. त्या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी कालच्या धुमश्चक्रीची किनार या भेटीला असल्याने सर्वांचे लक्ष फडणवीस यांच्या प्रतिक्रियेकडे लागले होते. मात्र, या हाय व्होल्टेज भेटीनंतर पत्रकारांनी फडणवीस यांना गाठले असता, बुधवारी जे काही घडले, ती फार काही गंभीर गोष्ट नाही, आमची विकासकामांवरच सविस्तर चर्चा झाली आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडताना 'अशा' गोष्टी कधी-कधी होत असतात अशी सारवासारव त्यांनी केली. फार काही गंभीर घडलेले नाही, असा निर्वाळा देत फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या या लोकप्रतिनिधींची अप्रत्यक्षरित्या पाठराखण केली.

Udayanraje - Shivendra Raje - Devendra Fadnavis meeting

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या