Satara Police News : पालखी सोहळ्यातील ६६ उपद्रवींवर कारवाई


वारकर्‍यांच्या वेशातील पोलिसांनी दाखवला कायद्याचा हिसका

Satara Police News : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असताना चोरीमारीच्या उद्देशाने वारीत घुसलेल्या ६६ जणांवर जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली. पालखी सोहळ्यात अशा घटना घडू नयेत म्हणून जिल्हा पोलीस दलाने वारकर्‍यांच्या वेशातील पोलिसांची पथके ठेवली होती. त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावत अशा उपद्रवी लोकांना कायद्याचा हिसका दाखवला.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने दि. १८ ते २३ जूनदरम्यान सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण केले. सोहळ्यातील लाखोंच्या गर्दीत फक्त भाविकच असतात असे नव्हे, तर गर्दीचा फायदा घेत चोर्‍यामार्‍या करणारे भामटेही घुसलेले असतात. त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी उपाययोजना करून असे गुन्हे रोखण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. 

वारकर्‍यांच्या वेशातील सात पथके

त्यानुसार देवकर यांनी स्वत:सह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, आरती नांद्रेकर, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके व अंमलदारांसह वारकर्‍यांच्या वेशातील सात पथके तैनात केली होती. त्यांना दिवस-रात्र कामकाजाचे नियोजन करुन योग्य ते मार्गदर्शन केले होते. 

या पथकाने जिल्ह्यातील पालखी सोहळ्यादरम्यान वारीत चोरीच्या, पाकीट मारण्याच्या, बॅग चोरी अगर मौल्यवान वस्तू चोरण्याच्या इराद्याने संशयितरीत्या वावरताना तसेच वारीमध्ये बेशिस्त वर्तन करताना मिळून आलेल्या ६६ इसमांवर प्रतिबंधक कारवाई केली.

अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन 

सपूर्ण पालखी सोहळ्यादरम्यान लोणंदमधील एक चेन चोरीखेरीज कोणताही अनुचित प्रकार न घडता पालखी सोहळा शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल बंदोबस्तावरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख तसेच अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या