Satara Rain News : कोयनेचा पाणीसाठा प्लसच्या दिशेने


हुश्श... सातारा जिल्ह्यात मान्सून धडकला, मनासारखा बरसला !

Satara Rain News : केवळ शेतकरीच नव्हे, तर तमाम जनता ज्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती तो मान्सून अखेर आज सातारा जिल्ह्यात येऊन धडकला आणि मनासारखा बरसला. महाबळेश्वरला तर मान्सूनच्या पावसाने सलामीलाच दमदार बॅटिंग केली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची एन्ट्री समाधानकारक झाली असून पाणीसाठ्याचा प्रवास प्लसच्या दिशेने सुरू झाला आहे.

जून महिना संपत आला तरी मान्सूनचे आगमन न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच जनता कासाविस झाली होती. पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत होता. कोयना धरणासह सर्वच धरण प्रकल्पांनी तळ गाठल्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या धास्तीने लोक हवालदिल झाले होते. मान्सूनच्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या जनतेला मान्सूनच्या आगमनाने आज सुखद धक्का दिला. दुपारपासून जिल्ह्यात सर्वदूर मान्सूनच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या व वातावरणात गारवा निर्माण झाला. 

महाबळेश्वरला दमदार, अन्यत्र रिमझिम

सातारा शहर व परिसरात दुपारी पावणेदोनपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. महाबळेश्वर व परिसरात दिवसभरात तब्बल ८७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पाटण, कराड, कोरेगाव, खंडाळा, वाई, जावली तालुक्यांमध्येही समाधानकारक पाऊस सुरू झाला असून दुष्काळी पट्ट्यात फलटण, खटाव, माण तालुक्यांमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच जनता आनंदित झाली असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

धरण क्षेत्रात पावसाची बॅटिंग

महाराष्ट्राला वरदायी ठरलेल्या कोयना धरणाने तळ गाठला होता. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयनानगरला ४९, नवजाला ४४, तर महाबळेश्वरला ८७ मिलिमीटर पाऊस पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजता १०.६८ टीएमसीवर असलेला पाणीसाठा १०.७५ टीएमसी झाला आहे. धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली हा सर्वांसाठीच एक चांगला संकेत आहे.

Koyna Dam, Mahabaleshwar Rain

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या