Satara Media News : पत्रकार संघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी कारकीर्द वांझोटी गेली नाही. आता अधिस्वीकृती समितीवरील कारकिर्दही वांझोटी जाणार नाही. सातार्याला अभिमान वाटेल अशीच आपली कारकिर्द असेल, अशी ग्वाही पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे नवनिर्वाचित सदस्य व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी दिली.
पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हरीष पाटणे आणि चंद्रसेन जाधव यांचा येथील शासकीय विश्रामगृहावर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, परिषदेचे प्रतिनिधी सुजित आंबेकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे, श्रीकांत कात्रे, गजानन चेणगे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार कदम, डिजीटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष सनी शिंदे प्रमुख उपस्थित होते.
‘संघर्षा तुझेच नाव हरीष पाटणे’ : चव्हाण
अधिस्वीकृतीच्या अटी जाचक आहेत. त्या शिथिल करून ग्रामीण भागातील सहकार्यांना सहज, सुलभ अधिस्वीकृती मिळावी. ज्येष्ठ पत्रकारांना हेलपाटे घालायला लागू नयेत यासाठी अधिस्वीकृती समितीतील कारकिर्द पणाला लावेन असे पाटणे म्हणाले. हरीष पाटणे यांचा पत्रकारितेतील संघर्ष मी जवळून पाहिला आहे. वृत्तपत्राची जबाबदारी सांभाळताना संघटना व सामान्य लोकांसाठीची त्यांची तळमळ आणि संवेदना पाहिल्यानंतर वाटते हरीष पाटणे होणे सोपे नाही. ‘संघर्षा तुझेच नाव हरीष पाटणे’, असाच त्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करावा लागेल असे उद्गार जीवनधर चव्हाण यांनी यावेळी काढले.
राज्यात सातार्याची मान उंचावली - कुलकर्णी
विनोद कुलकर्णी म्हणाले, हरीष पाटणे, चंद्रसेन जाधव यांची अधिस्वीकृती समितीवर निवड झाल्याने राज्यात सातार्याची मान उंचावली आहे. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून हरीष पाटणे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांना काम करताना संघर्षही करावा लागला. कामात अडथळे आणले गेले. मात्र, पाटणे यांचा बेरीज करण्याचा स्वभाव आहे. आक्रमकता, प्रभावी जनसंपर्क, प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती यामुळे पाटणे यांनी अध्यक्षपदाची छाप पाडली आहे.
जिल्हाभरातून पत्रकारांची उपस्थिती
यावेळी शरद काटकर, तुषार भद्रे, श्रीकांत कात्रे, गजानन चेणगे, दत्ता मर्ढेकर, सुजित आंबेकर, राहूल तपासे, अरूण जावळे, दादासाहेब चोरमले, डॉ. प्रमोद फरांदे, ओंकार कदम, जयंत लंगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सनी शिंदे यांनी केले. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, सातारा इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ, सातारा डिजीटल मीडिया परिषदेचे सर्व सदस्य, जिल्ह्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Accreditation Committee Pune Division
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या