Ravindra Mahajani News : रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड


बंद फ्लॅटमध्ये केव्हा प्राणपाखरू गेले कळलेही नाही; फ्लॅटसंस्कृतीचे भीषण वास्तव

Ravindra Mahajani News : आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीवर ८० व ९० च्या दशकात अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथील फ्लॅटमध्ये शुक्रवारी ते मृतावस्थेत मिळून आले.

गेल्या काही महिन्यांपासून ते तळेगाव दाभाडे येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन फ्लॅटचा दरवाजा तोडला असता महाजनी त्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले. दोन ते तीन दिवसांपूर्वी रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांचा मुलगा गश्मीर हा अभिनयाच्या क्षेत्रात असून तो मुंबईत राहतो. त्याला ही माहिती देण्यात आली आहे. 

प्रभावी व्यक्तिमत्व, कसदार अभिनय

प्रभावी व्यक्तिमत्व लाभलेल्या रवींद्र महाजनी यांनी आपल्या कसदार अभिनयातून विविध भूमिका अजरामर केल्या. त्यांनी प्रामुख्याने मराठी हिंदी व गुजराथी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या 'झुंज' या चित्रपटाद्वारे १९७५ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी (इ.स. १९७८), दुनिया करी सलाम (इ.स. १९७९), गोंधळात गोंधळ (इ.स. १९८१), मुंबईचा फौजदार (इ.स. १९८५) तसेच देवता हे चित्रपट विशेष गाजले.

Ravindra Mahajani Died, Marathi Film Industry 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या