एकिवनंतर दुसरी घटना; पर्यटन स्थळांवरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
Satara News : साताऱ्याजवळील एकिव धबधब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजीतून घडलेली दोन युवकांच्या खुनाची घटना ताजी असतानाच सडावाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळ पर्यटनासाठी आलेल्या दांपत्याला बेदम मारहाणीची घटना घडली आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पश्चिम घाटात धुवाधार पाऊस सुरू असल्यामुळे डोंगर कड्यातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्या धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक हौशी पर्यटक भेटी देत आहेत. मात्र, या याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय एका दांपत्याला आला आहे.
जाब विचारला म्हणून मारहाण
पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा पहायला सातारा तालुक्यातील एका गावातील दाम्पत्य गेले होते. त्यावेळी पतीला तिच्या पत्नीसमोरच सहा जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्या सहा तरुणांनी पत्नीकडे पाहून आरडाओरडा केल्यामुळे त्यांना जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण केली आहे.
सडावाघापूरला गेल्यावर त्या ठिकाणी पवनचक्कीजवळ उभे राहून दोघांनी मोबाईलमधून काही सेल्फी काढले. त्यांच्याप्रमाणे धबधब्याच्या ठिकाणी इतर ५ ते ६ तरुणही फिरण्यासाठी आले होते. त्यांनी पत्नीकडे पाहून आरडा-ओरडा केला. त्यांच्या आरडाओरडा करण्यामुळे पतीने त्यांच्याकडे जाऊन त्यांना जाब विचारला असता त्या तरुणांनी पतीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार
आपल्या पतीला मारताना पाहिल्यानंतर पत्नीने त्या तरुणांना पतीला सोडा अशी विनवणी केली. आणि पतीला तरुणांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ती पुढे गेली असता त्या तरुणांनी तिला धक्काबुक्की करत बाजूला ढकलले. मारल्यानंतर ते तरुण त्या ठिकाणाहून पसार झाले. मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीने पतीला घेऊन थेट मल्हारपेठ पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीने फिर्याद दाखल केल्यानंतर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार आनंद आव्हाड करत आहेत.
Sadawaghapur reverse fall, Ekiv Waterfall near Satara
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या