Satara News : डी. फार्मसी विद्यार्थ्यांना 'कॅरीऑन'मुळे दिलासा


विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले; शासनाच्या निर्णयाचे पालक, विद्यार्थ्यांकडून स्वागत 

श्रीरंग काटेकर

Satara News : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाने २०२२ - २३ या शैक्षणिक वर्षामध्ये डी फार्मसी परीक्षेसाठी बसलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना नियम व अटीच्या अधीन राहून द्वितीय वर्षात प्रवेश (कॅरीऑन) देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्यातील सर्व डी फार्मसी महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने २०२३ मध्ये घेतलेल्या उन्हाळी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी तांत्रिक आक्षेप नोंदविला होता. यामध्ये सन २०२२- २३ चे शैक्षणिक वर्ष ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू होण्याऐवजी जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाले होते. त्यामुळे अकरा महिन्याचे महाविद्यालय शैक्षणिक कामकाज अपेक्षित असताना केवळ तीन महिन्यातच प्राध्यापकांना अभ्यासक्रम उरकावा लागला. त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालावर झाला. सन २०२२ -२३ चा निकाल संपूर्ण राज्यात अल्प लागल्याने विद्यार्थी पालक वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याबाबतची लेखी तक्रार निवेदने संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राचार्यांमार्फत तंत्र शिक्षण संचालक व संबंधित विभागाच्या सचिवांपर्यंत पाठवली होती.

विद्यार्थी हितास्तव 'कॅरीऑन'चा निर्णय

या विषयाचे गांभीर्य व तक्रारीचा अभ्यास करून विद्यार्थी हितास्तव पात्र सर्व विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड (एक वेळ संधी) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयामुळे राज्यातील प्रथम वर्ष डी. फार्मसी विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला असला तरी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाचे राहिलेले विषय हिवाळी परीक्षा २०२३ मध्ये सोडविणे बंधनकारक आहे.

विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम

दहावी - बारावीच्या निकालानंतर पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणार्‍या विलंबामुळे असंख्य प्रश्न निर्माण होतात. याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होतो. याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात 'कॅरीऑन'सारखे निर्णय घेण्याची दुर्दैवी वेळ येऊ नये यासाठीचे नियोजन होणे आवश्यक आहे.

- अपूर्व ढोक, विद्यार्थी

अनुत्तीर्ण विषय देणे बंधनकारक

कॅरीऑन निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षात संधी मिळणार असली तरी अनुत्तीर्ण विषय देणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हुरळून न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

- प्राचार्य विजय राजे, गौरीशंकर डी. फार्मसी (लिंब, सातारा)

D. Farmacy Students News, Goyrishankar Knowledge City, Maharashtra Govt. Decision About Carry On

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या