Satara News : 'गौरीशंकर'मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


नाईपर व जीपॅट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिमान - जगताप

Satara News : औषधनिर्माण शास्त्र शाखेतील उच्चतम ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी करिअर उज्ज्वल घडवावे, असे आवाहन गौरीशंकर नॉलेज सिटीचे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी केले. नाईपर व जीपॅट परीक्षेत विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान वाटतो, असे प्रशंसोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (हैदराबाद) यांच्यातर्पेâ घेण्यात आलेल्या नाईपर २०२३ परीक्षेमध्ये गौरीशंकर संस्थेच्या देगाव (ता. जि. सातारा) येथील सातारा कॉलेज ऑफ फार्मसीमधील सुजीत जगदाळे (रँक १८६), ऋत्विक धायगुडे (रँक ३२४), प्रकाश कुंभार (रँक ८५९), सुशांत लाड (रँक ९५४), रोहन जगदाळे (रँक ११०१), गणेश सावंत (रँक ११४३), आदित्य अंबी (रँक २९४३) तसेच तन्वी देशमुख हिने जीपॅट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. 

यशस्वीतांचे मान्यवरांकडून अभिनंदन

यावेळी प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर, डॉ. अविनाश भोसले, प्रा. मंजिरी जाधव, रजिस्ट्रार हेमंत काळे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुध्द जगताप, डॉ. चेतना बगाडे - पाटील. जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन प्रा. मंजिरी जाधव यांनी केले. 

Gourishankar Knowledge City, Degaon [Satara], Naiper & G Pat Examinations

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या