अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा जुन्या घरात... असे करू नका बाबांनो !
Satara News : सातारा तालुक्यातील डोंगर माथ्यावरील मोरेवाडी व सांडवली या दरडप्रवण गावांमधील कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये मोरेवाडी येथील २२, तर सांडवली येथील २१ कुटुंबांना गावातीलच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.
गेल्या चार वर्षांपासून मोरेवाडी, सांडवली, भैरवगड परिसरात अतिवृष्टीमुळे रस्ता खचणे, जमिनीला भेगा पडणे तसेच पाण्याचा प्रवाह गावात येऊन पाणी घरात घुसणे असे प्रकार घडले होते. सध्या इर्शाळवाडी येथील भीषण आपत्तीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, मंडलाधिकारी तसेच इतर विभागाच्या मदतीने मोरेवाडी, सांडवली येथील कुटुंबांना निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे.
रात्रीचा मुक्काम निवारा शेडमध्ये
मोरेवाडी येथे गावाच्या वरच्या बाजूला काही धोकादायक दगड आहेत. तसेच या परिसरातील जमीन खचत आहे. त्यामुळे येथील स्थानिकांसाठी दिवसभर आपली शेतातील कामे तसेच आपली जनावरे सांभाळल्यानंतर रात्री सुरक्षित ठिकाणी निवाराशेड बांधले आहेत. या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच सांडवली येथील कुटुंबांसाठी वारसवाडी दावण या ठिकाणी काही घरकुले उभारण्यात आली आहेत. या घरकुलांमध्ये त्यांची निवासाची सोय करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनो, प्रशासनाचे आदेश पाळा !
आम्ही पूर्वीपासून असेच राहत आलो आहोत, याहीपेक्षा मोठा पाऊस होता, आमच्या दारातून ओढा वाहत होता, जमिनीलाही भेगा पडत होत्या असे म्हणत अशा दरडप्रवण गावातील कुटुंबे गावातच राहतात. प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी गावात आल्यावर त्यांच्यापुढे सुरक्षित ठिकाणी जातात आणि ते गेल्यावर पाठोपाठ ही कुटुंबे आपल्या जुन्या घरात जाऊन राहतात अशी परिस्थिती आहे. मात्र वेळ कधी कशी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रशासनाचे म्हणणे ऐका व सुरक्षित ठिकाणी राहा असे आवाहन केले जात आहे.
Families in landslide-prone Morewadi, Sandavali (Satara district) are shifted to a safe place.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या