Satara News : स्मार्टफोन होतोय गृहकलहाचे कारण


स्मार्टफोनच्या अतिरेकी व अनाठायी वापरातून कौटुंबिक हिंसाचाराला खतपाणी

Satara News : आर्थिक अस्थिरतेबरोबरच स्मार्टफोन, व्हाट्सअप आणि समाज माध्यमांचा अतिरेकी आणि अनाठायी वापर हा गृहकलहाचे कारण बनत असल्याचे डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे निरीक्षण सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी नोंदवले आहे.

समाजातील विविध घटकांच्या हक्कांसाठी विशेषतः स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधापासून कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात राज्यभर व्यापक चळवळ उभारलेल्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी आर्थिक, सामाजिक बदलांमुळे समाज जीवनावर झालेल्या दाहक परिणामांची पत्रकारांशी बोलताना मीमांसा केली.

घटस्फोटाचे महत्त्वाचे कारण

याप्रसंगी ॲड. देशपांडे यांनी अस्वस्थ समाजमन आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने कारणमीमांसा करताना आपली निरीक्षणे नोंदवली. स्मार्टफोनच्या अतिरेकी व अनाठायी वापरामुळे कौटुंबिक स्वास्थ्य हरवत चालले आहे. आर्थिक अस्थिरता वाढल्याने त्यात भरच पडली आहे. अनावश्यक भौतिक गरजांमुळे खर्च आणि अपेक्षा वाढल्या आहेत. चांगला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध नसल्याने वैफल्यग्रस्त तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे कौटुंबिक हिंसा वाढत असून ही बाब घटस्फोटाचे महत्त्वाचे कारण ठरत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

दारूबंदीसाठी एकाही गावाकडून पुढाकार नाही

यापूर्वी आम्ही जनजागृती करून ७० दारू दुकाने मतदानाच्या माध्यमातून बंद केली होती. मात्र सध्या व्यसनाधीनता वाढत असूनदेखील दारूबंदीसाठी या पूर्ण वर्षभरात एकाही गावाने पुढाकार घेतल्याचे अगर सहकार्य मागितल्याचे दिसत नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

हक्कांबाबत महिलांमध्ये जागरूकता

बहिणी, विधवा सून, वृद्ध आई यांना जमीन आणि घराच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे, त्यांचा हक्क डावलण्याचे प्रकार अधिक असून स्त्रीया आपल्या जमीन आणि घर विषयक हक्कांसाठी जागरूक होत आहेत याबद्दल समाधान व्यक्त करतानाच, सामूहिक शहाणपण आणि सामाजिक वचक, गावकी - भावकी, ग्रामसभा, महिला मंडळ, तंटामुक्ती समिती या व्यवस्था निष्प्रभ झाल्यामुळे कौटुंबिक, सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे यावर त्यांनी बोट ठेवले.

Domestic Violence Act News, Ad. Varsha Deshpande 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या