शैलेंद्र निपाणे यांना 'मास्टर ऑफ सायन्स विथ मेरिट' हा किताब
Satara News : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील निगुडमाळ येथील शैलेंद्र गोविंद निपाणे यांनी लंडन येथील 'मास्टर ऑफ सायन्स विथ मेरिट' हा किताब मिळवून महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा नावलौकिक परदेशात वाढवला आहे.
शैलेंद्र यांचे वडील गोविंद निपाणे हे निगुडमाळ गावचे मुंबई मंडळाचे सचिव होते. शैलेंद्र हे गेल्या तीन वर्षांपासून लंडन येथे वास्तव्यास असून त्यांनी लंडन येथे कंप्यूटर फॉरेन्सिक व सायबर सिक्युरिटी या विषयातील पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना या शिक्षणावरच लंडन येथील मास्टर ऑफ सायन्स विथ मेरिट हा किताब मिळाला आहे.
कर्तृत्वाने वाढवला गावचा लौकिक
शैलेंद्र यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे पूर्ण झाले असून उच्च शिक्षण त्यांनी बाहेरच्या देशात पूर्ण केले आहे. परळी खोऱ्यातील निगुडमाळ सारख्या दुर्गम गावातून मुंबई येथे उदरनिर्वाहासाठी स्थायिक झालेल्या निपाणे कुटुंबीयांनी शिक्षणाच्या जोरावर आपल्या गावाचेच नव्हे तर आपल्या देशाचे नाव उज्वल केले आहे.
Shailendra Nipane, Master of science with merit
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या