उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आयोजन
Shivsena News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अधिक श्रावण व निज श्रावण मास शनेश्वर आनंद सोहळा यानिमित्त शनिवारी (दि. २९) सोळशी (ता. कोरेगाव) येथे मोफत कर्करोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
श्री शनेश्वर देवस्थान, शिव आरोग्य सेना तसेच शेंद्रे येथील ऑन्को लाईफ हॉस्पिटल या सर्वांच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
या शिबिराचा लाभ कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री नंदगिरी महाराज, शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक निमिश शहा, कोरेगाव तालुका समन्वयक वसंत धुमाळ, नायगावचे सरपंच नितीन धुमाळ, शाखाप्रमुख संभाजी (राजे) धुमाळ आदींनी केले आहे.
Uddhav Thackeray Birthday, Cancer diagnosis and treatment camp, Nandgiri Maharaj, Shaneshwar devasthan, Solashi
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या