Satara News : वराडेच्या दिशेने एकाच वेळी तीन बिबटे


सीसीटीव्ही फुटेज बघून गावकऱ्यांची उडाली गाळण; वनविभाग बघ्याच्या भूमिकेत

Satara News : पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्याजवळ असलेल्या वराडे गावच्या शिवारातून आज पहाटे एकाच वेळी तीन बिबटे गावाच्या दिशेने येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने गावकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. 

महामार्गालगत असलेल्या वराडे गावाच्या दक्षिण बाजूला डोंगराकडून गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर दत्तप्रसाद इंटरप्राईजेस ही फर्म आहे. या फर्मबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास तीन बिबटे वराडे गावाच्या दिशेने निघाल्याचे दिसत आहे. हे फुटेज आज सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे वराडे व आसपासच्या परिसरातील लोकवस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऊस क्षेत्र बिबट्यांचे आश्रयस्थान

कराड, पाटण तालुक्यात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून अलीकडच्या काळात ते बिबट्यांचे आश्रयस्थान बनत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकवस्तीकडे बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गुरे, शेळ्या मेंढ्या त्याचप्रमाणे कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले करण्याच्या घटना वाढल्या आहेत. साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

मंगळवारी पाळीव कुत्र्याचा फडशा 

वराडे परिसरात राहणाऱ्या आनंदराव जाधव यांच्या घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्याचा मंगळवारी रात्री बिबट्याने फडशा पाडला होता. ही घटना ताजी असल्यामुळे भागात भीतीचे वातावरण आहे. अशातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गावकऱ्यांची भीतीने गाळण उडाली आहे. मात्र अलीकडे बिबट्यांचा उपद्रव वाढला असूनही वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. 

एक मादी व दोन बछडे 

दरम्यान, हे तीन बिबटे म्हणजे एक मादी व दोन तिचे बछडे असल्याचे मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे यांनी म्हटले आहे.

Leopard in Varade, near Taswade Toll plaza 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या