Satara News : वारी ही जगातील एकमेव अद्वितीय परंपरा


सातारच्या ‘मुक्तांगण’मध्ये ज्ञानेश्वर बंडगर महाराजांशी रंगला खुला संवाद

Satara News : लोकांमध्ये जातीभेदापलीकडे जाऊन धार्मिक सलोखा प्रस्थापित करणारी, समतेच्या मूल्यांचा संस्कार देणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि धार्मिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे. एकाच दिशेने, एकाच विचाराने लाखो माणसे चालत जाऊन आपल्या देवाची उपासना करण्याची वारी ही जगातील एकमेव अद्वितीय अशी परंपरा असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांनी केले.  

सातारा येथील 'मुक्तांगण, नव विचार प्रेरणा केंद्र' या ठिकाणी आयोजित 'संत आणि वारकरी परंपरा, परिचय आणि समता संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. समतेचा विचार गवसल्याचा आनंद नाचून व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजे वारी असे उद्गारही त्यांनी यावेळी काढले. साने गुरुजींच्या दलित मंदिर प्रवेशाच्या संदर्भातील आमरण उपोषण, दादा महाराज सातारकर यांचे मोठेपण, बडवे हटाव संदर्भात झालेली कायदेशीर लढाई याविषयी सविस्तर चर्चा करत त्यांनी त्याविषयी माहिती दिली. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करत मांडणी केली.

कार्यक्रमात मान्यवरांचा सहभाग 

कार्यक्रमास प्रकाश टोपे, सुजित शेख, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अ‍ॅड. शैला जाधव, डॉ. डी. बी. जाधव, प्रा. संजीव बोंडे, शिरीष जंगम, चंद्रकांत कांबिरे, प्रकाश खटावकर, हौसेराव धुमाळ, विनायक आफळे, अनिता काळे, प्रतीक मुंजेवार, गजानन चेणगे, अरुण जावळे, स्वाती बल्लाळ, कोमल जाधव, हबीबा नदाफ, अ‍ॅड. वनराज पवार, अ‍ॅड. चैत्रा व्ही. एस., शाहीर वैâलास जाधव उपस्थित होते. शमीमा अख्तर या काश्मिरी गायिकेने गायलेल्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad. Varsha Deshpande, Dnyaneshwar Bandgar Maharaj

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या