शुभदा गायकवाड यांचे निधन; संगममाहुलीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Satara News : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव एन. जी. गायकवाड यांच्या पत्नी व कराड येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांच्या आई सौ. शुभदा नारायण गायकवाड (वय ७५) यांचे गुरूवारी रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या मागे पती, तीन मुले कॉन्ट्रॅक्टर अभयराज, प्राचार्य महेश, शिक्षक गिरीष तसेच सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. शुभदा गायकवाड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी संगम माहुली (सातारा) येथील कैलास स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षिका म्हणून प्रदीर्घ सेवा
शुभदा गायकवाड यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाई, नागठाणे, तळमावले येथील विद्यालयांबरोबरच सातारा येथील भवानी हायस्कूलमध्ये प्रदीर्घकाळ शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. भवानी हायस्कूलमधून पर्यवेक्षिका पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या. सध्या सातारा येथे वास्तव्य असलेल्या गायकवाड कुटुंबीयांचे मूळ गाव चाफळ (जि. सातारा) असून शुभदा यांचे माहेर सातारा होते. माहेरी त्यांना सर्वजण बेबीताई म्हणून ओळखत असत. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शिक्षक, विद्यार्थी यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
रविवारी रक्षा विसर्जन विधी
रक्षा विसर्जन विधी रविवार दि. ३० रोजी सकाळी ९.३० वाजता संगम माहुली येथे होणार आहे.
Principal Dr. Mahesh Gaikwad, Swami Vivekananda shikshan Sanstha
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या