Satara News : गोरड यांना उंब्रजकरांचा कडक सॅल्यूट


बदलीनिमित्त सन्मानपूर्वक मिरवणूक काढत, पुष्पवृष्टी करत दिला निरोप

Satara News : अधिकारपद ही लोकसेवेची संधी मानून चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना समाज डोक्यावर घेतो याची प्रचिती रविवारी उंब्रजमध्ये आली. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना बदलीनिमित्त निरोप देताना त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी जो सन्मान दिला तो त्यांच्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीला दिला गेलेला कडक सॅल्युटच मानावा लागेल.

गेली जवळपास साडेचार वर्षे उंब्रज पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांची कराड शहर पोलीस स्टेशनला नुकतीच बदली झाली. आता गोरड साहेब उंब्रजमध्ये नसणार ही कल्पनाही अनेकांना असह्य झाली. नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी करुन त्यांचा सत्कार केला. गाडी सजवून फुलांचा वर्षाव करत पोलीस ठाण्यातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेकांना गहिवरून आले. 

इतिहासात प्रथमच असा निरोप

भव्य मिरवणूकीची गाडी प्रत्यक्ष नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांची ओढून या अधिकाऱ्याच्या कामाला सॅल्युट केला. उंब्रज पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच अशा अनोख्या पद्धतीने एखाद्या अधिकाऱ्याला असा निरोप देण्यात आला.

सज्जनांचे संरक्षण, दुर्जनांचा कर्दनकाळ 

अजय गोरड यांनी उंब्रज येथे काम करताना गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांच्यावर वचक निर्माण केला. गुन्हा घडण्यापुर्वीच बंदोबस्त करण्याच्या खास शैलीत त्यांनी काम केले. अनेक गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केले.  सामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात सन्मान मिळवून दिला. यातून त्यांनी पोलिसांचे ब्रीदवाक्य सत्यात उतरवून दाखवले. त्यामुळेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे अजय गोरड यांचा भव्य सन्मान केला.

Satara police, Umbraj police station, assistant police inspector Ajay Gorad 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या