Satara News : सातारा शहरात रिक्षाचालकांची मनमानी

छाया - अतुल देशपांडे, सातारा
छाया - अतुल देशपांडे, सातारा

आता जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा !

Satara News : सातारा शहरात रिक्षा व्यावसायिकांचा मनमानीपणा सुरू आहे. रिक्षा स्टॉप सोडून वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यात रिक्षा लावणे, वाटेल तेवढे भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतुक करणे राजरोसपणे सुरू आहे. मात्र, पोलीस अथवा परिवहन विभागाला हा विषय महत्त्वाचा वाटत नाही. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी अशा प्रकाराला आळा घालून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरात सध्या 'मुकी बिचारी कुणी हाका' या उक्तीनुसार सातारकर नागरिकांना ऑटो रिक्षातून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. सातारा मुख्य बस स्थानकापासून राजवाडा बस स्थानकापर्यंत चालणार्‍या शेअर रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबले जात आहेत. शेअर रिक्षामध्ये नियमाप्रमाणे तीन प्रवासी घेणे योग्य असताना चालकासह पुढे तीन आणि मागील सीटवर तीन याप्रमाणे सहा प्रवासी घेऊन केलेली वाहतूक ही दुर्घटनेला आमंत्रण देणारी ठरणार नाही का असाच प्रश्न पुढे येत आहे. बस स्थानक परिसरात वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी असला काय आणि नसला काय या रिक्षा चालकांचे हे असे वर्तन बिनधास्त आणि खर्‍या अर्थाने मनमानी कारभाराचे ठरत आहे.

घाबरून गल्लीबोळातून नव्हे, टिच्चून दारातून

वाहतूक शाखेचे कर्मचारी याकडे कानाडोळा करत आहेत का सराईतपणे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असेच विचारावेसे वाटते. कारण अशी जादा प्रवासी वाहतूक करताना पूर्वी रिक्षा खाजगी चालक शक्यतो मुख्य चौकातून वाहन न दामटता भीतीपोटी गल्लीबोळातून अशी वाहतूक करत होते. मात्र ही रिक्षा वाहतूक सहा प्रवासी घेऊन बिनधास्तपणे पोलीस मुख्यालय, शहर पोलीस ठाण्यासमोरून सुरू असते. कोण काय करते अशाच थाटात हा प्रकार सुरू असताना यावर आता जाब आणि न्याय कोणाला विचारायचा असा प्रश्न सामान्य सातारकरांना पडत आहे.

वाहने उचलण्याशिवाय अन्य जबाबदारी नाही काय ? 

त्यामुळे वाहतूक शाखेकडे बहुदा नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलण्याशिवाय अन्य जबाबदारी नाही काय असा सवाल विचारला जात आहे. आता जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने स्वत: जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी अशा प्रकाराला आळा घालून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Satara City Autoriksha, Satara Police, Satara RTO

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या