Satara News : सातार्‍यात रविवारपासून जनावरांचा बाजार


कायदेशीर लढाई जिंकून मिळवलेल्या खिंडवाडीच्या जागेवर रविवारी शुभारंभ 

Satara News : सातारा बाजार समितीच्या खिंडवाडी (ता. सातारा) येथील नवीन जागेवर शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार दर रविवारी जनावरांचा बाजार भरवला जाणार आहे. या आठवडा जनावरे बाजाराचा शुभारंभ रविवारी (दि. ३० जुलै) सकाळी १० वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार असल्याची माहिती सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी दिली.

कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीने खिंडवाडी येथील जागा मिळवली असून या ठिकाणी विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार विकसित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जागेच्या अभावी गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे बाजार बंद होता. आता बाजार समितीकडे पुरेशी जागा उपलब्ध झाली असून शेतकर्‍यांच्या हितासाठी आणि सोयीसाठी या ठिकाणी दर रविवारी जनावरांचा बाजार भरवण्यात यावा, अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी बाजार समितीला केली होती. त्यानुसार येत्या रविवारपासून खिंडवाडी येथे (कणसे ढाब्याशेजारी, हायवेलगत) बाजार समितीच्या जागेत जनावरे बाजाराचा शुभारंभ केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेतकर्‍यांची फसवणूक थांबणार 

जनावरांचा व्यापार करणार्‍या लोकांकडून अनेकदा शेतकर्‍यांची फसवणूक होत असते. शेतकर्‍यांना उच्च प्रतीची दर्जेदार जनावरे स्वत: पाहून, पसंत करून योग्य किमतीत खरेदी करता यावीत, तसेच इच्छुक शेतकर्‍यांना आपली जनावरे योग्य किमतीत विक्री करता यावीत यासाठी बाजार समितीच्या खिंडवाडी येथील विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार येथे आठवडा जनावरे बाजार सुरु करण्यात येत आहे. या ठिकाणी इच्छुक शेतकर्‍यांनी आपली जनावरे विक्री करण्यासाठी आणावीत तसेच ज्या शेतकर्‍यांना जनावरे खरेदी करावयाची आहेत अशा सर्वांनीच या जनावरे बाजारात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार आणि संचालक मंडळाने केले आहे.

MLA Shivendrasinhraje Bhosale, Satara Bajar Samiti

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या