आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जितेंद्र डुडी
Satara News : सातारा जिल्ह्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील रेस्क्यू टीम सतर्क ठेवण्यात आले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत जिल्ह्यातील रेस्क्यू टीम यांना आपत्कालीन साहित्याच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर, जिल्ह्यातील रेस्क्यू टीम सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील 'या' रेस्क्यू टीमना वाटप
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँण्ड रेस्क्यू टीम, छञपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम (सातारा), शिरवळ रेस्क्यू टीम, सह्याद्री ट्रेकिंग अँड स्पोर्टस असोसिएशन (महाबळेश्वर), खंडाळा रेस्क्यू टीम यांना आपत्कालीन साहित्याचे वाटप करण्यात आले.
Disaster management of Satara, Mahabaleshwar trackers, Pratapgad search and rescue team, Shirwal rescue team, Sahyadri tracking and sports association, Khandala rescue team, Chhatrapati ShivendrasinhRaje Bhosale rescue team
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या