Satara News : पोलीस चौकीचे लोकार्पण 'लवकरच'च्या घोळात


१४ ऑगस्टपर्यंत लोकार्पण न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

Satara News : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस चौकी व्हावी यासाठी २००५ पासून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पोलीस चौकीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु त्याचे लोकार्पण झालेले नाही. ते लोकार्पण व्हावे यासाठी पाठपुरावा केल्यानंतर लवकरच होईल असे सांगितले होते, परंतु ते झालेले नाही. या पोलीस चौकीचे लोकार्पण १४ ऑगस्टपर्यंत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चे यासारखी आंदोलने होत असतात. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी २००५ पासून अनेकदा उपोषण, जनआंदोलन केले. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस चौकीचे काम पूर्ण केले आहे.

काम पूर्णत्वास जाऊनही लाभ नाही 

हे काम पूर्णत्वास जाऊन बरेच दिवस झाले तरी अद्यापही पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना या चौकीचा लाभ घेता आला नाही. या पोलीस चौकीचे लोकार्पण १५ दिवसात न झाल्यास २४ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज वर्ग केला असून त्यांच्या स्तरावर प्रश्न सोडवून घ्यावा असे कळवण्यात आले. त्यामुळे २४ जुलैचे धरणे आंदोलन केले नाही. परंतु पोलीस अधीक्षकांनी या प्रश्नावर न्याय न दिल्यास, पोलीस चौकीचे लोकार्पण न झाल्यास दि. १४ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

Satara Collector Office, Satara Police

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या