खिंडवाडीत लवकरच सुसज्ज मार्केट यार्ड उभारणार - शिवेंद्रसिंहराजे
Satara News : जागेअभावी गेली अनेक वर्ष बंद झालेला सातारा येथील जनावरांचा बाजार आता पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे शेतकर्यांचा आणि खास करून पशुपालक शेतकर्यांचा फायदा होणार आहे. बाजार समितीच्या नवीन जागेत विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार उभारणीचे काम सुरु झाले असून याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा बाजार समितीकडे खिंडवाडी येथे पुरेशी जागा उपलब्ध झाली असून शेतकरी हितासाठी या ठिकाणी दर रविवारी जनावरांचा बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उप सभापती मधुकर पवार यांच्यासह सर्व संचालक, विविध मान्यवर आणि पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनावरांचा दवाखाना सुरु करणार !
जनावरांचा व्यापार करणार्या लोकांकडून अनेकदा शेतकर्यांची फसवणूक होत असते. शेतकर्यांना उच्च प्रतीची, जातिवंत जनावरे स्वत: पाहून, पसंत करून योग्य किमतीत खरेदी करता यावीत, तसेच इच्छुक शेतकर्यांना आपली जनावरे योग्य किमतीत विक्री करता यावीत यासाठी बाजार समितीच्या खिंडवाडी येथील विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार येथे आठवडा जनावरे बाजार सुरु करण्यात आला आहे. लवकरच याठिकाणी जनावरांचा दवाखाना सुरु करणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी जाहीर केले. तसेच याठिकाणी लवकरच सुसज्ज आणि अद्ययावत मार्केट यार्ड उभारून व्यापारी आणि शेतकर्यांची गैरसोय दूर केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
Satara Market Committee, MLA Shivendrasinhraje Bhosale
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या